Ad will apear here
Next
आमदार जयंत पाटील १७ नोव्हेंबरला अकोला दौऱ्यावर
मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील १७ नोव्हेंबर २०१८ रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर असून, या दौऱ्यामध्ये अकोला जिल्हा, ग्रामीण आणि तालुका कार्यकारिणीच्या आढावा बैठका व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिटीचा मेळावा घेणार आहेत,’ अशी माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘१७ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता अकोला येथील कै. डॉ. कुसुमताई वामनराव कोरपे यांच्या स्मृतीशिल्पाचे अनावरण प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी अकोला शहर जिल्हा, ग्रामीण व तालुका कार्यकारिणीच्या लागोपाठ आढावा बैठका होणार आहेत. सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद झाल्यानंतर मराठा मंडळ स्टेशनरोड येथे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिटीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत अकोला जिल्ह्यातील विधीतज्ज्ञ, व्यापारी, डॉक्टर्स, व्यावसायिक यांच्याशी प्रदेशाध्यक्ष संवाद साधतील.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZSYBU
Similar Posts
राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजय खोडके मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी संजय खोडके प्रदेश उपाध्यक्षपदी, तर बळीराम साठे यांची सोलापूर ग्रामीण कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे नुकतेच जाहीर केले.
नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष नियुक्त्या जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन २०१८-२० पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक पार पडली असून, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेची पहिली यादी जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज (१४ मार्च) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
‘उमेदवार चाचपणीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल’ मुंबई : ‘लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिथे शक्ती आहे तिथे काम करण्यासाठी, जागा लढवण्यासाठीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि तिथल्या उमेदवारांच्याबाबतीत चाचपणी करण्यात आली आणि त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल,’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language